Author name: gpredi

Places

माइनिंग

रेडी हे गाव माइनिंगसाठी प्रसिद्ध आहे. लाल रंगाचे व निळ्या रंगाचे मिनी ट्रक भरून खाणीतून काढलेली माती बोटीत भरण्यासाठी नेताना […]

Places

यशवंतगड किल्ला

रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्‍या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्‍यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा यशवंतगडाची कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे

Places

श्री गणपती मंदिर

रेडी गावातील गणपती मंदिराचा इतिहास १९७६ मध्ये एका ट्रकचालकाला आलेल्या दृष्टांतामुळे सुरू झाला, ज्यात त्याला गणपतीची मूर्ती सापडलेल्या ठिकाणी खोदण्यास

Places

स्वयंभू श्री देवी माऊली मंदिर

रेडीमधील माऊली देवीला कोकणातील ३६० गावांची राणी मानले जाते आणि ती स्थानिक लोकांमध्ये अत्यंत पूजनीय आहे. स्वयंभू श्री माऊली माता ही पूर्वीच्या काळी महत्त्वाचे सागरी बंदर असलेल्या रेडीपट्टणम् म्हणजेच आजच्या रेडी या गावची ग्रामदेवता आहे. ही देवी अंबा या नावाने ओळखली जाते. तिला सत्याची देवता मानली जाते. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली मातेचा कौल सर्व भाविक शिरोधार्ह मानतात. असे सांगितले जाते की तेराव्या वा चौदाव्या शतकात माऊली मातेचे मूळ मंदिर येथे बांधण्यात आले होते. यानंतर इ.स. १८२८ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर २००० ते २००८ या कालावधीत प्राचीन मंदिराच्या मूळ गर्भगृहाच्या रचनेस धक्का न लावता या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. या मंदिराची आख्यायिका अशी की जोधना (गोवा) येथून राम कामत आणि भातनागस हे दोघे रेडी परिसरातील या भागात शिकारीकरीता आले होते. त्या काळात हा भाग घनदाट जंगलाचा होता. ते शिकार करून थकले. रात्र झाली होती. त्यामुळे त्यांनी एका तलावाकाठी मुक्काम करण्याचे ठरवले. जवळच्याच झाडावर माची तयार करून ते तिथे झोपले. मध्यरात्री भातनागस याला दिव्य तेजाने झळाळणारी पालखी दिसली. त्याने राम कामत यालाही उठवून ती पालखी दाखवली. एवढ्या अपरात्री घनदाट जंगलात ती पालखी पाहून ते अचंबित झाले. नंतर त्यांना झोप लागली. झोपेत भातनागसला स्वप्न पडले. स्वप्नात देवीमाता सांगत होती की माझे स्थान येथील दुर्गाजवळ आहे. ती जागा स्वच्छ करून तिथे गाव वसवा. मी सर्वांचे कल्याण करीन. सकाळी उठल्यावर भातनागसने राम कामतला या स्वप्नाबद्दल सांगितले. जवळच्या गावातील लोकांना सांगून त्यांनी दुर्गाच्या परिसरात शोधकाम केल्यावर त्यांना येथे देवीची मूर्ती सापडली. याच ठिकाणी तिची स्थापना करण्यात आली. कालांतराने येथील भाग विकसित झाला.     

Scroll to Top