श्री गणपती मंदिर

रेडी गावातील गणपती मंदिराचा इतिहास १९७६ मध्ये एका ट्रकचालकाला आलेल्या दृष्टांतामुळे सुरू झाला, ज्यात त्याला गणपतीची मूर्ती सापडलेल्या ठिकाणी खोदण्यास सांगितले गेले; गणेशाची ही मूर्ती जमिनीत सुमारे आठ फ़ुटांवर सापडली होती. त्यानंतर सापडलेली ही स्वयंभू, द्विभुज गणपतीची मूर्ती आजही रेडीच्या खाणीजवळ भाविकांसाठी एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मँगनिज खाणींमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्द असलेले गाव आत्ता येथील नवसाला पावणारा स्वयंभू द्विभूज गणेशाच्या मंदिरामुळे नावारुपास आलेलं आहे. पूर्वी मँगनिज धातूची येथे जोरदार वाहतूक सुरु असे, खाणीत सापडणारे कच्चे मँगनिज खाणीपासून जेट्टीपर्यंत नेण्यासाठी मोठ्याप्रमाणात ट्रकची वाहतूक होई. पूर्वीया वाहतूक व्यवसायात ट्रकचालक असलेले “श्री. सदानंद कांबळी” यांना १८ एप्रिल १९७६ रोजी पहाटे दृष्टांत झाला. त्या स्वप्नांत श्री गणेशांनी दर्शन देवून ठरविक ठिकाणी माझी मूर्ती आहे, ती जागा मोकळी कर असा आदेश दिला. स्व्प्नांत झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री. कांबळी यांनी गावातील काही रहीवाश्यांना घेवून त्या जागेवर खणण्यास सुरुवात केली. दोन दिवसांनंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला. गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकूमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. तो पर्यंत मे महिना उजाडला. १ मे १९७६ रोजी संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली. श्री गणेशाची मूर्ती जांभा दगडावर कोरलेली असून आसनस्थ आहे आणि विशेष म्हणजे ती द्विभुजाकार आहे. ६ फ़ुट उंच आणि साडे चार फ़ुट रुंद अशी ही लंबकर्ण गणेशाची अति दिव्य, देखणी, प्रसन्न, विशाल मूर्ती पाहिल्यावर भाविकांना प्रसन्नता वाटते. सव्वा महिन्यांनी श्री गणेशाचे वाहन असणारी मूषकाची मूर्ती दुसर्‍या एका खाणीत सापडली. ती या गणेश मूर्तीसमोर आणून ठेवण्यात आली. पुराणकाळात पांडवानी आणि ॠषिमुनींनी अनेक ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरांची स्थापना केली होती ही मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि ती जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे भाविकांची अढळ श्रद्धा आहे.

 

Scroll to Top