रेडी हे गाव माइनिंगसाठी प्रसिद्ध आहे. लाल रंगाचे व निळ्या रंगाचे मिनी ट्रक भरून खाणीतून काढलेली माती बोटीत भरण्यासाठी नेताना दिसतात. मग त्या बोटी जहाजात रिकाम्या केल्या जातात आणि परदेशात पाठविली जाते. तेथे खनिजे वेगळी केली जातात. मंगळवार ते रविवार असे ६ दिवस काम चालते आणि सोमवार हा सुट्टीचा दिवस असतो. (साधारणपणे एक जहाज भरायला ३० ते ४० बोटींना १० ते १५ दिवस लागतात.) आता बऱ्याच कमी प्रमाणात तेथे खनिज उपलब्ध असल्याने गोगटे माइनिंग आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. बाकीच्या २ सुरु आहेत.

